आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood\'s Most Loved Villain Pran Passes Away

ज्येष्ठ अभिनेते प्राण पंचतत्त्वात विलीन, अजरामर भूमिकांमध्ये कायम राहतील जीवंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीचा देखणा खलनायक प्राण ऊर्फ प्राण कृष्ण सिकंद यांच्या पार्थिवावर आज (शनिवार) दुपारी १२ च्या सुमारास शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सुपरस्टार अमिताभ बच्चन, भाजप नेते शत्रुज्ञ सिन्हा, गुलजार, टीनू आनंद, करण जोहर, शक्‍ति कपूर, रजा मुराद, डॅनी आदी बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. प्राण यांचे पार्थिव पंचतत्त्वात विलीन झाले तेव्हा त्यांचे कुटुंबीय, नातलग आणि मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते.

प्राण यांचे काल (१२ जुलै, शुक्रवार) लीलावती रुग्णालयात निधन झाले. प्राण साहेबांच्या निधनावर त्यांचे चाहते, बॉलिवूड सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती आदींनी शोक व्यक्त केला आहे.

अधिक छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा