आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood\'s Most Loved Villain Pran Passes Away

बॉलिवूड सेलिब्रिटीज प्राण यांच्या अंत्यसंस्काराला का गेले नाहीत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एखादा पुरस्कार समारंभ असला किंवा प्रमोशन इव्हेंट असली, की त्याला बॉलिवूड सेलिब्रिटीज आवर्जून भेट देतात. परंतु, ज्येष्ठ अभिनेते प्राण यांच्या अंत्ययात्रेला आणि अंत्यसंस्काराला अनुपस्थित राहुन आपल्यातील माणुसकी आता शिल्लक राहिलेली नाही असे सेलिब्रिटींनी सिद्ध केले आहे. सोशल मीडियावर प्राण यांना श्रद्धांजली अर्पण करून वेळ वाचविण्याला प्राथमिकता देऊन सेलिब्रिटींनी सोईस्कर पळवाट काढल्याचे दिसून आले आहे.

यासंदर्भात बोलताना ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद म्हणाले, की या जागी जर एखादा पुरस्कार वितरण समारंभ असता तर सेलिब्रिटींनी गर्दी केली असती. परंतु, प्राण यांची अंतिम भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे जराही वेळ नाही. सेलिब्रिटींमधील माणूसकी मेली असल्याचे यावरून दिसून येते. प्राण यांच्यासाठी बॉलिवूडमधील मान्यवर तासभरही काढू शकत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे.

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते शत्रुज्ञ सिंन्हा म्हणाले, की प्राण यांच्या अंत्यसंस्काराला बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित नव्हते याचे मला अतिशय वाईट वाटले. फालतू कार्यक्रमाला उपस्थित राहणारया सेलिब्रिटींनी जरा माणूसकी दाखवायला हवी होती.