आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माधुरीचा \'गुलाब गँग\' झाला फ्लॉप, \'क्वीन\'ने कमावले 20 कोटी रुपये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (14 मार्च) यशराज फिल्म्सचा 'बेवकूफिया' प्रदर्शित झाला आहे. निर्मिती आणि प्रिंट-प्रचारचा एकुण 20 कोटींचा खर्च सिनेमाला आला आहे. हा खर्च भरून काढण्यास यशराज फिल्म्सला कोणतीच कसरत करावी लागणार नाहीये. सिनेमाचे यश कलाकार आयुष्मान खुराना आणि सोनम कपूर यांच्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे.
मागील आठवड्यात प्रदर्शित झालेल्या सिनेमांपैकी '300: राइझ ऑफ एन एम्पायर' या हॉलिवूड सिनेमाला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले. परंतु रिलीज झालेल्या सिनेमांमध्ये 'गुलाब गँग' आणि 'टोटल सियापा' या दोन्ही सिनेमांना मोठे नुकसान झेलावे लागले आहे. दोन्ही निर्मात्यांनी सिनेमासाठी लावलेल्या पैशांच्या 50 टक्के नुकसान होणार आहे. माधुरी दीक्षित नेने एक विलक्षण अभिनेत्री आहे परंतु तिचे कमबॅकचे तिन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच फ्लॉप ठरले आहेत. (आजा नच ले, डेढ इश्किया आणि गुलाब गँग)
मागील आठवड्यात 'क्वीन' सिनेमाने खूपच साधारण ओपनिंगसोबत 1.8 कोटींची कमाई केली. परंतु लोकांनी सिनेमा पसंत केल्याने या सिनेमाने एका आठवड्यात 20 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय केला आहे. सिनेमाची कहाणी आणि कंगनाचा अनोखा अभिनय 'क्वीन'च्या यशाचे कारण आहे. कंगनाने यापूर्वी 'गँगस्टर' आणि 'तनु वेड्स मनु'मध्येसुध्दा उत्कृष्ट अभिनय केला होता.
'क्रिश 3'मध्ये नायिकेच्या भूमिकेतसुध्दा तिची बरीच प्रशंसा झाली होती. चांगल्या अभिनय करूनसुध्दा तिला फिल्म इंडस्ट्रीच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळाले नाही. याचे दोन कारण असू शकता. पहिले म्हणजे, सिनेसृष्टीशी संबंधीत नसेलेल्या कुटुंबातील असलल्यामुळे आणि दुसरे कारण म्हणजे, तिच्यासोबत खूपच कमी मोठ्या बॅनरने काम केले आहे. 'क्नीन'चे यश तिच्यासाठी नवीन दार उघडेल. तिला आघाडीची नायिका बनण्याची इच्छा आहे.