आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Box Office Will Ragini Mms 2 Get A Bumper Opening

बॉक्स ऑफिसवर हॉरर चित्रपट आमने-सामने, 22 कोटीत बनला 'रागिनी MMS-2'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आठवड्यात भूतांवर आधारित ‘रागिणी एमएमएस-2’ आणि ‘गँग्ज ऑफ घोस्ट्स’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. यापैकी ‘रागिणी..’ भीती दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, तर ‘गँग..’ एक विनोदी चित्रपट आहे. बालाजी फिल्मला ‘रागिणी..’ बनवण्यासाठी प्रिंट आणि प्रचारासह एकूण 22 कोटी रुपये खर्च आला. उत्तेजना+हिट, संगीत+हॉरर आणि नायिका सनी लियोनचे कॉकटेल बॉक्स ऑफिसवर सुरक्षित मानले जात आहे. यामुळे वेगवेगळ्या वितरण क्षेत्रांमध्ये विविध वितरकांनी बालाजी फिल्म्सकडून महागड्या किमतीत सिनेमा खरेदी केला आहे. इंडस्ट्रीला धडाकेबाज ओपनिंगचा विश्वास आहे. वितरकांनाही मोठय़ा फायद्याची आशा आहे. ‘गँग्ज ऑफ घोस्ट्स’ बंगालच्या सुपरहिट ‘भूतेरभॉबिश्यत’ या सिनेमावर आधारित आहे. निर्माते रतन जैन यांना प्रिंट आणि प्रचारासह सिनेमासाठी एकूण 20 कोटी रुपये खर्च आला आहे. प्रदर्शनापूर्वी सॅटेलाइटचे अधिकार 9 कोटींमध्ये विकून ते नफा-तोट्याच्या दृष्टीने काही प्रमाणात सुरक्षित झाले आहेत.
गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेला यशराज बॅनरचा ‘बेवकुफियां’ विशेष कमाल दाखवू शकला नाही. या सिनेमाने आठवडाभरात 12 कोटी इतकी कमाई केली. यशराजने आपल्या ब्रँडनेमच्या जोरावर सिनेमाच्या सॅटेलाइट अधिकार विक्रीतून चांगली रक्कम वसूल केली आहे. त्यामुळे सिनेमाचा खर्च वसूल करण्यात त्यांना अधिक मेहनत घ्यावी लागणार नाही. मात्र, सिनेमाचे सरासरी यश अभिनेता आयुष्मान खुराणासाठी मोठा झटका आहे, तर दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘क्वीन’ने आश्चर्यचकित केले आहे. बर्‍याच वर्षांनंतर पहिल्या व दुसर्‍या आठवड्यात सारखाच व्यवसाय असलेला सिनेमा आला. त्याने दोन आठवड्यांमध्ये 40 कोटींचा व्यवसाय केला आहे. मागील दोन वर्षांत ‘कहानी’, ‘विकी डोनर’ आणि ‘भाग मिल्खा भाग’नेही हे सिद्ध केले होते. आता चित्रपटसृष्टी नायकांच्या मागे न धावता चांगल्या कथानकावर आधारित सिनेमांच्या निर्मितीवर आपले लक्ष केंद्रित करेल, अशी अपेक्षा आहे.