आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृतिक होऊ शकतो गोवारिकरच्या 'मोहनजोदडो'चा नायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनला घेऊन तयार केलेला 'खेले हम जी जान से' या फ्ल़ॉप सिनेमाचा दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर एका टीव्ही प्रोजेक्ट व्यतिरिक्त त्याच्या नवीन सिनेमावर काम करत आहे. त्याच्या या सिनेमाची कहाणी सिंधु घाटीच्या सभ्यतावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाचे नाव अद्याप ठरलेले नाही. परंतु ऐकवण्यात आहे, की 'मोहनजोदडो' असे सिनेमाते नाव असू शकते.
आता आशुतोष सिंधु घाटी सभ्यतावर संशोधन करत आहे. सिनेमाची पटकथाही तयार केली जात आहे. सुत्राच्या सांगण्यावरून, की सिनेमाचा नायक हृतिक रोशन असू शकतो. कथितरित्या हे दोघे अलीकडेच दिल्लीमध्ये भेटले होते. तेव्हा याविषयी बरिच बातचीत त्यांच्यामध्ये झाली. सध्या 'बँग बँग' सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त हृतिक अलीकडेच 'शुध्दी'सारख्या मोठ्या बजेटच्या सिनेमातून बाहेर पडला आहे. त्याने सिनेमा सोडण्याचे कारण प्रकृती ठिक नसल्याचे आणि तारखा मिळत नसल्याचे सांगितले होते. आशुतोषच्या सिनेमाची शुटिंग उशीरा सुरू होणार असल्याने त्याला या प्रोजेक्टशी सहजरित्या जोडता येऊ शकते. या सिनेमामध्ये ए. आर. रहमान यांचे म्यूझिक असणार आहे.