आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणामध्ये झाला बॉयफ्रेंडमुळे वाद तर कुणामध्ये निर्माण झाला करिअरमुळे दुरावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही दिवसांपासून माधुरी दीक्षित आणि जूही चावलाच्या आगामी 'गुलाब गँग' या सिनेमाच्या ट्रेलरने सर्वत्र धूम घातली आहे. या दोन्ही अभिनेत्री पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे, की 90च्या दशकात या दोन्ही अभिनेत्री एकमेकींच्या प्रतिस्पर्धी होत्या, परंतु 'गुलाब गँग'मध्ये दोघींना एकत्र काम करण्यासाठी काहीच अडचण आली नाही.
आम्हाला दिलेल्या एका मुलाखतीत जूही चावलाने ही गोष्ट स्वीकार केली, की यापूर्वीसुध्दा तिला माधुरीसह एकत्र काम करण्यासाठी अनेक ऑफर आल्या होत्या, परंतु त्यावेळी तिने स्पष्ट नकार दिला होता. याचे कारण सांगताना ती म्हणली, की 'तेव्हा आम्ही शत्रु होतो आणि मी विचार करायचे की माधुरीसोबत काम करायचे नाही...कारण लोक आमच्या दोघींमध्ये तुलना करतील.
जेव्हा तिला 'गुलाब गँग'विषयी विचारले तर तिने सांगितले, या सिनेमात तिने दोन कारणांमुळे काम केला आहे, पहिले म्हणजे यात माधुरी होती आणि दुसरे म्हणजे सिनेमाची पटकथा.
जूहीने माधुरीची मनमोकळेपणाने प्रशंसा केली आणि म्हणाली माधुरी एक उत्कृष्ट कलाकार आहे. सोबत तिने या मुलाखतीत सांगितले, की जेव्हा 'गुलाब गँग'चा प्रस्ताव माझ्याकडे आला तेव्हा मी नकार देऊ शकले नाही. कदाचित आम्हाला भविष्यात एकत्र काम करण्याची संधी मिळू शकणार नाही. असे सिनेमे पुन्हा-पुन्हा बनत नाहीत .
जर फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासावर एक नजर टाकली तर बॉलिवूडमध्ये अनेक अशा अभिनेत्री आहेत ज्यांचे कोणत्या ना कोणत्या कारणांवरून एकमेकींसोबत वाद झाले आहेत. आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत, ज्या आहेत एकमेकींच्या शत्रु, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...