आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Catfight Between Deepika Padukone And Katrina Kaif

दीपिका-कतरिनामध्ये रस्सीखेच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीरसोबत जवळीकी बाबत कतरिनाने दीपिका पादुकोनला केव्हाच मात दिली आहे. पण आता या दोघींमध्ये आगामी सिनेमातील भूमिका हिसकावण्याची चढाओढ सुरू आहे.

अलीकडेच निर्माता सुनील व्होरा आणि आयकॉम 18 ने हेमा मालिनीच्या ‘सीता और गीता’चा रिमेक बनण्यासाठी या मूळ सिनेमाचे अधिकृत हक्क खरेदी केले आहेत. रिमेकमध्ये हेमा मालिनीची भूमिका करण्यासाठी या दोघीही इच्छुक आहेत. त्याचबरोबर श्रीदेवीचा डबल रोल असलेल्या ‘चालबाज’ या सिनेमाचे रिमेक करण्यासाठी निर्माता ए. पूर्णचंद्राकडून झीटीव्हीने हक्क खरेदी केले आहेत. 'चालबाज'च्या रिमेकमध्येही मुख्य भूमिका मिळवण्यासाठी दोघींमध्ये चढाओढ सुरू आहे. 'सीता और गीता'साठी या दोघींमध्ये स्पर्धा असली तरी संजीव कुमारच्या भूमिकेसाठी इम्रान हाशमी तर धमेंद्र यांच्या भूमिकेसाठी इमरान खानची निवड पक्की झाल्याचे कळते.