आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caught In Lip Controversy Anushka Sharma Will Ad Lipstick!

ओठांच्या शस्त्रक्रियेने चर्चेत आलेली अनुष्का करणार लिपस्टिकची जाहिरात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने ओठांवर शस्त्रक्रिया केली अशी मागील काही दिवसांत जोरदार चर्चा चालू होती. त्यावेळी अनुष्काने टि्वटर अकाउंटवर पोस्ट करून सांगितले होते, की ती 'बॉम्बे वेल्वेट' सिनेमासाठी तात्पुरत्या सौंदर्यप्रसाधनांचा ओठांच्या आकारासाठी वापर करीत आहे. तिला ओठांवर शस्त्रक्रिया करणे आवडत नाही.
या 'बँड बाजा बारात' गर्लला अलीकडेच एका कंपनीने ओठांच्या जाहिरातीसाठी ऑफर केले आहे. कंपनीला तिच्या ओठांच्या शस्त्रक्रियेविषयी माहित आहे.
अनुष्काच्या जवळच्या सुत्राने सांगितले, 'अनुष्काला अलीकडेच या कंपनीने एका लिपिस्टिक जाहिरात सादर करून दाखवली. ते बघून ती खूप आनंदी दिसली आणि शुटिंगसाठी बरीच उत्साही दिसली.'
सध्या अनुष्का आणि विराट कोहलीच्या अफेअरच्या अफवांनासुध्दा उधाण आले आहे. अनुष्काच्या ओठांच्या शस्त्रक्रियेविषयी विराटला एका पत्रकाराने विचारले तेव्हा तो खूप नाराज झाला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अनुष्काच्या ओठांच्या शस्त्रक्रियेविषयी कशा सुरू झाल्या चर्चा?