आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caught: Vidya Balan Begging Outside Hyderabad Railway Station

स्टेशनबाहेर भीक मागणा-या या सेलिब्रिटीला तुम्ही ओळखलंत का ? पाहा काय झाली अवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वरील छायाचित्रात दिसणा-या व्यक्तीला तुम्ही ओळखलंत का ? हा चेहरा तुमच्या परिचयाचा आहे, असं तुम्हाला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का ? ही व्यक्ती आहे बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री विद्या बालन. अचंबित झालात ना. होय ही विद्या बालनच आहे. आगामी 'बॉबी जासूस' या सिनेमात विद्या बालन या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भूमिकेच्या गरजेनुसार विद्याने आपले रुप पालटले असून हैदराबादच्या रेल्वे स्टेशनबाहेर बसून ती भीक मागत आहे.

विद्याचा हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमात विद्याने चक्क भिकारीची भूमिका साकारली आहे. तेथून जाणा-या काही लोकांनी तिला भिकारी समजून पैसे दिले त्यावेळी विद्याचे हे छायाचित्र क्लिक करण्यात आले.
सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर विद्याचे हे छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा विद्याची आणखी काही छायाचित्रे...