आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2013 मधील TOP 13 सेलिब्रिटीज, ज्‍यांच्‍यामुळे वाढली रँम्‍प ची शान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाइफस्‍टाईल डेस्‍क: 2013 हे वर्ष फॅशन जगतासाठी अत्‍यंत महत्‍वकांक्षी ठरले आहे. शरारा ही जुनीच फॅशन नव्‍याने सुरु झाली आहे. रँपवरील या फॅशनदरम्‍यान प्रादेशिक सांस्‍कृतिक दर्शन घडत आहे. यामध्‍ये पंजाबी आणि राज्‍यस्‍थानी संस्‍कृतीमधील डिझायनर्सनी आपल्‍या डिझाईनची वेगळी छाप पाडली आहे.

प्रामुख्‍याने यामध्‍ये ब्राइडल वीक, विल्‍स लाईफास्‍टाइल इंडिया वीक, आम्‍बी वैली इंडिया ब्राइडल फॅशन वीक, लक्‍मे फॅशन वीक, इत्‍यादी यशस्‍वी फॅशनशो झाले आहेत. या वर्षी डिझायनर्सनी गूलाबी, फुशिया, आणि तांबूस पिवळसर रंगांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे.

यावर्षी फॅशन शोमध्‍ये शरारा फॅशनची चलती दिसली. लेटेस्‍ट शरारा डिझाइनमध्‍ये स्‍टोन वर्क, बीड्स, आणि एम्‍ब्रॉयडरी यांचा वापर अधिकतम आढळला. या वर्षी फॅशन डिझायनर अनामिका ख्‍ान्‍ना यांनी धोती साडीचा फॅशन ट्रेंड आनला.

जसे रंगाशिवाय कोणतीली फॅशन अर्धवट असल्‍याचे मानल्‍या जाते तसेच सेलिब्रेटींशिवाय फॅशनशो अधुरे मानल्‍या जातात. सेलिब्रेटींनी कॅटवॉक करण्‍यावर बरेच वाद आहेत. काही डिझायनर्स मते त्‍यांनी डिझाईन केलेले पोशाख्‍ा महत्‍त्‍वाचे असतात. तर काहींना असे वाटते, की सेलिब्रेटीज रॅम्‍पवर चालल्‍यास थोडे मनोरंजन होते आणि डिझाईनची किंमत वाढते.

पुढील स्‍लाइडवर बघा, 2013 मधील अशा सेलिब्रेटज, की ज्‍या रॅम्‍पवर आल्‍या आणि सर्वांच्‍या नजरा त्‍यांच्‍याकडे आकर्षिल्‍या गेल्‍या.