आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities On Social Networking Sites Are Disturbed By Rumors Of Death

SHOCKING: वेळेआधीच या सेलिब्रिटींनी बघितला स्वतःचा मृत्यू !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभर पसरलेल्या इंटरनेटच्या जाळ्याने जगाला खूप छोटे केले आहे. सोशल नेटवर्किंग साईट्वर पसरणा-या अफवांची संख्या कमी नाहीये. मग ती एखाद्याच्या लग्नासंदर्भातील असो, ब्रेकअपबद्दलची असो किंवा चक्क एखाद्याच्या मृत्यूसंदर्भातील. सोशल नेटवर्किंग साईटवर अशा प्रकारच्या अफवा पसरणे हे आता नित्यनेमाचेच झाले आहे. हं पण ही अफवा जर सेलिब्रिटींच्या मृत्यूसंदर्भातील असली तर मग विचारायला नको. कित्येकदा सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रसिद्ध सेलिब्रिटीचा मृत्यू झाला, असे ट्विट केल्या जाते आणि मग श्रद्धांजली वाहणा-यांची संख्या विचारायलाच नको.

अलीकडच्याच काळात ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांच्या निधनाची बातमी पसरली होती. कादर खान यांच्यापूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांच्याही निधनाची बातमी सोशल नेटवर्किंग साईटवर पसरली होती. या बातमीमुळे बच्चन कुटुंबियांना मनःस्ताप सहन करावा लागला होता.

एक नजर टाकुया अशा काही सेलिब्रिटींवर ज्यांच्या मृत्यूच्या अफवा सोशल नेटवर्किंग साईट्सवर वा-यासारख्या पसरल्या होत्या.