आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrity Talk Sayarabano And Dilip Kumar Love ship

सेलिब्रिटी टॉक: सायराबानोसोबतचे नाते आणखी दृढ झाले !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराच्या झटक्यातून सावरलेल्या ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांनी पत्नी सायराबानो यांच्याबाबत नुकतेच गौरवोद्गार काढले आहेत. सायरामुळेच आपण आजारातून लवकर बरे झाल्याची भावना त्यांनी ट्विटवरून व्यक्त केली. अलीकडेच या जोडीच्या लग्नाचा 47 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी बॉलीवूडमधील अनेक तारे-तारका यांची उपस्थिती होती.

गेल्या महिन्यात दिलीपकुमार यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागातही हलवण्यात आले होते. या वेळी पत्नी सायराबानो यांनी त्यांची विशेष काळजी घेतली. तसेच दिलीपसाब आजारातून बरे होतील, असा ठाम विश्वास सायरा यांना होता. गेल्या अनेक वर्षांपासून सायरा माझी काळजी घेते. तिच्यामुळे आजवर मी ठणठणीत राहिलो. त्यामुळे आता आमचे नाते आणखी दृढ होईल, असे दिलीपकुमार यांनी ट्विटवरून आपल्या चाहत्यांना सांगितले.

दिलीपसाब यांचा दिनक्रम
दिलीपकुमार दररोज सकाळी दहा वाजता उठतात. त्यानंतर नाष्टा करतात. यात दही-वडे, भजी किंवा बिस्किटे असतात. त्यानंतर एकच्या सुमारास ते दुपारचे जेवण घेतात. चार वाजता फलाहार आणि रात्रीचे जेवण आठच्या सुमारास असते. हा दिनक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सायरा यांनी दिलीपकुमार यांच्याबाबत पाळला आहे. त्यामुळे वयाच्या नव्वदीतही अजूनही ते तेवढेच जोशिले असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

दिलीपसाब यांचे ट्विट
‘इन्शाल्लाह, हम दोनों एक-दूसरे के लिए क्या मायने रखते हैं, इसे समझते हुए सायरा और मैं एक-दूसरे के साथ दिन बिताएंगे. अब हम एक-दूजे के लिए पहले से ज्यादा मायने रखते हैं.’