आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:शाहरुख-सलमानने घेतलेल्या गळाभेटीमुळे \'त्यांच्या\' चेह-यावर फुलले हास्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमदार बाबा सिद्दिकी यांनी रविवारी रात्री मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड्समध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. आम्ही बोलतोय ते सलमान खान आणि शाहरुख खानच्या गळाभेटीविषयी. या पार्टीत सहभागी होण्यासाठी रात्री आठच्या सुमारास सलमानपाठोपाठ शाहरुख आला. सलमान स्वत:हून शाहरुखच्या जवळ उभा ठाकला. इतकेच नाही तर त्याची गळाभेटसुद्धा घेतली. बॉलिवूडमधील दोन शत्रू तब्बल पाच वर्षांनंतर एकत्र आले आणि सगळ्यांसाठी चर्चेचा विषय ठरले.
या पार्टीत सलमान-शाहरुखसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. या दोघांमधला दुरावा दूर झाल्याचे बघून उपस्थितांच्या चेह-यावर हसू उमलले. शाहरुख-सलमानच्या गळाभेटी ही या पार्टीतील उपस्थितांसाठी एक दुर्मिळ क्षण होता.
बघा या पार्टीत शाहरुख-सलमानसह आणखी कोणकोणते सेलेब्स पोहोचले होते...