आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Celebs Visit Hinduja Hospital To See Hrithik Roshan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्जरीनंतर हृतिक एफबीवर म्हणतो, आय अ‍ॅम ओके!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याच्यावर रविवारी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात शस्त्रक्रीया करण्यात आली. त्याच्या डोक्यात गाठ झाल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर तडकाफडकी शस्त्रक्रीया करण्यात आली. आता हृतिक काही दिवस रुग्णालयातच आराम करणार असल्याचे वृत्त आहे.

शस्त्रक्रीयेनंतर हृतिकला भेटण्यासाठी मोठ्या संख्येने त्याचे मित्र, कुटुंबातील व्यक्ती, बॉलिवूडमधील सहकारी, सिलिब्रेटीज रुग्णालयात येत आहेत. बॉलिवूडचा किंगखान शाहरुख काही दिवसांपूर्वी हृतिकला भेटण्यासाठी आला होता.

रुग्णालयात आराम करीत असलेल्या हृतिक रोशनने आपले एक छायाचित्र फेसबुकवर पोस्ट केले आहे. आता मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे, असा संदेश त्याने आपल्या फॅन्सना दिला आहे. माझ्या प्रकृतीविषयी उत्सुकता दाखविल्याने मी चाहत्यांचा आभारी असल्याचे हृतिकने म्हटले आहे.

अधिक छायाचित्र बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा