आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नानंतर दोन दिवसांतच आली होती सेलिनाच्या प्रेग्नसीची बातमी, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मोजक्या हिंदी सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री सेलिना जेटली आज (23 जुलै) आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहे. आजच्याच दिवशी सेलिना तिचा बॉयफ्रेंड पीटर हागबरोबर लग्नगाठीत अडकली होती.
तब्बल महिनाभरानंतर सेलिनाने लग्न केले असल्याचा खुलासा केला होता.

गुपचूप लग्न करुन सेलिनाने ब-याच दिवसांनी ट्विटरच्या माध्यमातून लग्न केल्याचे स्पष्ट केले होते. सेलिनाने ट्विट केले होते की, ‘माझ्या प्रिय ट्विटरवरील मित्रांनो, मी सर्वांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छिते की, मागील महिन्याच्या 23 तारखेला ऑस्ट्रियातील एका हजार वर्ष जुन्या मठात पीटर हागबरोबर मी लग्न केलंय. आम्हाला तुमच्या शुभेच्छांची आणि आशीर्वादाची गरज आहे. काही कौटुंबीक समस्यांमुळे माझ्या लग्नाविषयी उशीरा सांगतल्याबद्दल माफी असावी.’

23 जुलै 2011 रोजी ऑस्ट्रियामध्ये सेलिना आणि पीटरचे लग्न झाले. पीटर ऑस्ट्रियाचे असून सध्या दुबईत ते स्थायिक झाले आहेत. पीटर एक नामवंत बिझनेसमन आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सेलिनाने आपल्या लग्नाबद्दल खुलासा केल्यानंतर दोन दिवसांनीच ती प्रेग्नेंट असल्याची बातमी आली होती. मार्च 2012 मध्ये सेलिनाने जुळ्या मुलांना जन्म दिला. सेलिनाने आपल्या मुलांची नावे विंस्टन आणि विराज अशी ठेवली आहेत.

सेलिनाने 2003 साली 'जानशीन' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'नो एन्ट्री', 'गोलमाल रिटर्न', 'थँक यू', 'विल यू मॅरी मी' यांसारख्या मोजक्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकली होती.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सेलिनाची पती आणि मुलांबरोबरची खास छायाचित्रे...