आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेश्या ते पंतप्रधान होणा-या तरुणीच्या कथेवर सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 1975 मध्ये रिलीज झालेल्या 'आंधी' या राजकीय विषयावर भाष्य करणा-या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. या सिनेमातील सुचित्रा सेन यांची भूमिका तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीशी साम्य साधणारी होती. सरकारच्या बंदीवर निर्माता जे ओमप्रकाश आणि दिग्दर्शक गुलजार यांनी कोर्टाचे दार ठोठावले होते, त्यानंतर सिनेमावरची बंदी हटवण्यात आली होती.
आता 'जाने भी दो यारो'सारख्या कल्ट क्लासिक सिनेमाचे दिग्दर्शन करणा-या कुंदन शाह यांच्या आगामी 'पी से पीएम तक' या सिनेमाला सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिले आहे. याच्या विरोधात कुंदन शाह आणि निर्माता जयंतीलाल गडा रिवाइजिंग कमेटीकडे गेले आहेत.
कुंदन शाह यांनी 'नुक्कड' आणि 'वागले की दुनिया' या मालिका दिग्दर्शित केल्या होत्या. शिवाय त्यांनी 'जाने भी दों यारो', 'कभी हां कभी ना' आणि 'क्या कहना' हे वेगळ्या धाटणीचे सिनेमे बनवले होते. आता कुंदन शाह अशा तरुणीची कथा पडद्यावर आणणार आहेत, जी वेश्या व्यवसायातून बाहेर पडत पंतप्रधान होण्यापर्यंत मजल मारते.
पुढील स्लाईड्सवर वाचा, सेन्सॉरने निर्माता जयंतीलाल यांना काय म्हटले...