आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'चेन्नई एक्स्प्रेस\' सुसाट, तीन दिवसांत 100 कोटींचा पल्ला गाठून रचला इतिहास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 9 ऑगस्टला रिलीज झालेला शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ने इतिहास रचला आहे. रिलीजच्या तीन दिवसांतच या सिनेमाने शंभर कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाची सुरुवात भारताबरोबरच इतर देशांमध्येही धमाकेदार झाली.

गेल्या आठवड्यात गुरुवारी (8 ऑगस्ट) या सिनेमाच्या पेड प्रीव्ह्यूने पावणे सात कोटींची कमाई केली. रिलीजच्या पहिल्या दोन दिवसांतच या सिनेमाची एकुण कमाई 67.92 कोटी (पेड प्रीव्ह्यूसमवते) रुपये इतकी झाली. रविवारनंतर हा आकडा शंभर कोटींच्यावर पोहोचला. केवळ तीन दिवसांत शंभर कोटींपेक्षा अधिकची कमाई करणारा 'चेन्नई एक्स्प्रेस' हा पहिला सिनेमा ठरला आहे.

विशेष गोष्ट म्हणजे शनिवारपर्यंत या सिनेमाने पाकिस्तानात 60 लाखांची कमाई केली आहे. हासुद्धा एक विक्रमच असल्याचे सांगितले जात आहे.