आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Chennai Express Registers Record Opening, Earns Rs. 33 Crore

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

BOX OFFICE : 'चेन्नई एक्स्प्रेस' सुसाट, पहिल्या दिवशी 33 कोटींची कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ने सुसाट वेग घेतला आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त रिस्पॉन्स मिळत आहे. या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी 32.12 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाने सलमान खानच्या 'एक था टायगर' या सिनेमाचा रेकॉर्ड मोडित काढला आहे.

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या सलमानच्या 'एक था टायगर'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी विक्रमी म्हणजे 31.25 कोटींची कमाई करुन इतिहास रचला होता. मात्र हा रेकॉर्ड शाहरुखच्या सिनेमाने तोडला. शाहरुखचा हा या सिनेमा सर्वाधिक स्क्रिन्सवर रिलीज झाला आहे.

'चेन्नई एक्स्प्रेस' बघण्यासाठी प्रेक्षक आतुर दिसले. रिलीजच्या पहिल्या दिवशी थिएटर आणि मल्टिप्लेक्सेसमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. शाहरुखच्या चाहत्यांनी सिनेमाचे अँडव्हान्स बुकींग केले होते. हा विकेंड सिनेमा हाऊसफूल्ल असल्याचे सांगितले जात आहे.