आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SUCCESS BASHमध्ये क्रू मेंबर्सना विसरला नाही शाहरुख, दिली जंगी पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या चेन्नई एक्स्प्रेसने बॉक्स ऑफिसवरील व्यवसायाची सगळी गणितं बदलून टाकली आहेत. एकामागून एक रेकॉर्ड करणा-या या सिनेमाने आत्तापर्यंत 270 कोटींच्यावर कमाई केली आहे. हा सिनेमा रिलीजच्या तीन दिवसांतच शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता.
आपल्या सिनेमाला मिळालेले हे यश शाहरुखने एक पार्टीचे आयोजन करुन सेलिब्रेट केले. या पार्टीत शाहरुखने सिनेमाची संपूर्ण टीमला आमंत्रित केले होते. दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरसह सिनेमातील कलाकार आणि प्रॉडक्शन टीम येथे हजर होती. मात्र सिनेमात मेन लीडमध्ये असलेल्या दीपिका पदुकोणची अनुपस्थिती जाणवली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा शाहरुखच्या सक्सेस बॅशची ही खास छायाचित्रे...