आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रांगदाच्या वैवाहिक आयुष्यात तेढ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिनधास्त भूमिका करून बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करणार्‍या चित्रांगदा सिंगच्या वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याची चर्चा आहे.

चित्रांगदाने बॉलिवूडमध्ये काही यशस्वी सिनेमे केले आहेत. बोल्ड भूमिकांसाठी ती ओळखली जाते. सिनेमात काम करण्यासाठी तिला मुंबईत राहावे लागते. तिचे पती गोल्फर ज्योती रंधावा आणि मुलगा नवी दिल्लीत राहतात. कामाच्या व्यग्रतेमुळे ती आपल्या पाच वर्षीय मुलाला आणि पतीला वेळ देत नाही.

सुत्रानुसार दूर राहण्यामुळे चित्रांगदाच्या वैवाहिक जीवनात तेढ निर्माण होत आहे. तिच्या मुलालाही तिला भेटू दिले जात नसल्याची चर्चा आहे. पतीसुद्धा तिच्यासोबत एकाही कार्यक्रमात दिसत नाहीत.

मात्र चित्रांगदाने या सर्व गोष्टींचे खंडन केले आहे. ती म्हणाली की, आमच्यात असे काहीच झालेले नाही, ही फक्त अफवा आहे. बॉलिवूडमध्ये काम करण्याला माझ्या पतीचा काही आक्षेप नाही, ते एक खेळाडू आहेत आणि प्रोफेशनल व्यक्तीची लाइफस्टाइल कशी असते, हे त्यांना माहीत आहे, असेही ती म्हणाली.