स्टॅण्ड अप कॉमेडियन कपिल शर्माला आता वेगळ्या परिचयाची गरज नाहीये. आपल्या विनोदबुद्धी आणि वन लाइनर पंचेसमुळे कपिल आज घराघरांत प्रसिद्ध झाला आहे. 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' हा कपिल शर्माचा कॉमेडी शो छोट्या पडद्यावरील सर्वाधिक टीआरपी मिळवणारा रिअॅलिटी शो ठरला आहे.
32 वर्षीय कपिल मुळचा अमृतसरचा आहे. आपल्या सुरुवातीच्या दिवसांत कपिलाल बराच संघर्ष करावा लागला होता. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या शोच्या तिस-या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या कपिलला आणि शोच्या निर्मात्यांनासुद्धा त्याला भविष्यात एवढं यश मिळेल याचा अंदाज नव्हता. एकेकाळी कपिल लोकांसाठी मोफत काम करायचा.
'कॉमेडी सर्कस'मध्ये सहभागी झाल्यानंतर लोक कपिलला ओळखू लागले आणि त्याच्या कलागुणांचं कौतुक होऊ लागलं. 'कॉमेडी सर्कस'चे बरेच पर्व जिंकल्यानंतर कपिलने हे सिद्ध केलं, की त्याचा जन्म लोकांच्या चेह-यावर हसू फुलवण्यासाठीच झाला आहे.
आता कपिलचा स्वतःचा शो प्रसारित होत आहे. त्यामुळे आता त्याचे संघर्षाचे दिवस संपले असून तो यशस्वी ठरला आहे, हे कुणीही सांगू शकेल.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कपिलच्या संघर्षाच्या काळातील छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमधली काही छायाचित्रे अशी आहेत, ज्यात कपिलला ओळखणंसुद्धा कठीण आहे.
बघा कपिलची दुर्मिळ छायाचित्रे...