आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Compare To Amir, Sallu, Sharukh Amitabh Still Cheap In Terms Of Fees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिर, सल्लू, शाहरुखच्या तुलनेत बॉलिवूडचा महानायक स्वस्तच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांनी आपल्या मानधनात भरमसाट वाढ केली आहे. यात आमिर खान हा सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. तो एका चित्रपटासाठी तब्बल 40 कोटी रुपये मानधनासह उत्पन्नातही वाटा घेतो. सलमान 23 ते 30 कोटी, तर शाहरुख 20 ते 25 कोटी मानधन घेतो. उत्पन्नातही हिश्श्याची त्यांचीही अट असते. मात्र, दशकांचा सुपरस्टार अमिताभ या तुलनेत खूप मागे असून ते एका चित्रपटासाठी केवळ 4 ते 6 कोटीच घेतात.


गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये केवळ दर्जाला महत्त्व देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक चित्रपट कोटींची उड्डाणे घेताना दिसतात. तसेच अनेक चित्रपट शंभर कोटींच्या वर कमाई करून देतात. त्यामुळे कलाकारांनीही आपल्या मानधनात भरमसाट वाढ केली आहे. यात खान बंधूंसह टॉपचे दहा अभिनेते अधिक मानधन घेतात.


अक्षयकुमार एका चित्रपटासाठी 18 ते 22 कोटी रुपये घेतो, तर रणबीर कपूर व हृतिक रोशन हे 15 ते 20 कोटींचे मानधन स्वीकारतात. त्याखालोखाल अजय देवगण 10 ते 16 कोटी रुपये घेतो, तर छोटे नवाब सैफ अलीखान 7 ते 10 कोटींमध्ये एका चित्रपटात काम करतो. जॉन अब्राहम आणि इम्रान खान यांनी आपला भाव 5 ते 7 कोटी रुपये ठरवला आहे, तर बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे मात्र सध्या चार ते सहा कोटी रुपये घेतात, हे विशेष.


रणबीरचा भाव वधारला
‘ये जवानी है दीवानी’च्या यशानंतर रणबीर कपूरने आपला ‘भाव’ अचानक वाढवला आहे. आगामी ‘बेशरम’ चित्रपटासाठी त्याने 15 कोटी मानधन व उत्पन्नात हिस्सा मागितला आहे. तसेच ‘रॉय’ चित्रपटासाठीही हाच आकडा कायम ठेवला आहे. काही वर्षांत रणबीर हा तीनही खानांना बंधूंना धोबीपछाड देऊन नवा सुपरस्टार होण्याची बॉलीवूडमध्ये चर्चा आहे.