आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Concerned SRK Was Taking Updates On Salman Khan\'s Case

तिकडे आरोपीच्या पिंज-यात उभा होता सलमान, इकडे शाहरुख पडला होता काळजीत !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शत्रूपासून त्याचा मित्र झालेला शाहरुख खान काळजीत पडला आहे.

बातमी अशी आहे, की 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये सध्या बिझी असलेल्या शाहरुख खानला त्याचा 'मित्र' सलमान खानबद्दल काळजी वाटत होती. याप्रकरणी कोर्ट काय निकाल देणार याची चिंता त्याला होती.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सलमान या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मुंबई सेशन कोर्टात पोहोचला तेव्हा शाहरुख आपल्या टीमकडून सलमानच्या खटल्याविषयी सतत माहिती घेत होता. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला चालणार असल्याचे शाहरुखला कळले तेव्हा तो निराश झाला.

काही दिवसांपूर्वीच शाहरुख आणि सलमानने पाच वर्षे जुने शत्रुत्व विसरुन आपापसांत मैत्री केली होती. आमदार बाबा सिद्दीकी यांनी अलीकडेच आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत हे दोघे तब्बल पाच वर्षांनी गळाभेट घेताना दिसले होते.

आता शाहरुखने सलमानविषयीची काळजी व्यक्त करुन आपल्यात सगळे काही ऑल इज वेल असल्याचे संकेत दिले आहेत, असे म्हणायला हरकत नाही.