आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CONFIRMED: ShahRukh Khan's Surrogate Baby Is Weak & Underweight; Brought Home On July 1

CONFIRMED: प्री-मॅच्युअर्ड आहे शाहरुखचे बाळ, 'मन्नत'वर गौरी घेतेय काळजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानच्या सरोगेट बाळाबद्दल दर दिवशी नवीन खुलासे होत आहेत. आता शाहरुखच्या निकटवर्तीयाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या या बाळाचा जन्म सातव्या महिन्यात झाला असून 1 जुलैला शाहरुख-गौरीने आपल्या या बाळाला 'मन्नत' या त्यांच्या घरी आणले.
27 मे रोजी जन्मलेले हे प्री-मॅच्युअर्ड असून त्याचे वजन केवळ दीड किलोग्रॅम आहे. त्यामुळे त्याला जुहू येथील नानावटी हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर परत ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्याला घरी आणण्यात आले आहे.
सुरुवातीली अशी बातमी होती की, आपल्या या बाळाचा जन्म लंडनमध्ये व्हावा, अशी शाहरुख-गौरीची इच्छा होती. मात्र प्री-मॅच्युअर्ड डिलीव्हरीमुळे या बाळाचा जन्म मुंबईतच झाला. अद्याप शाहरुख आणि गौरीने आपल्या या बाळाच्या जन्माविषयी मौनच बाळगले आहे.
अलीकडेच शाहरुख त्याच्या आगामी 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमाच्या म्युझिक लाँच इवेंटमध्ये दिला. यावेळी त्याने याविषयावर बोलण्यास नकार दिला. या कार्यक्रमाची होस्ट करिश्मा तन्नाने मीडियाला कार्यक्रम सुरु होण्यापूर्वीच शाहरुखला खासगी प्रश्न विचारु नये, असे सांगितले होते. मात्र तरीदेखील मीडियाने शाहरुखला याविषयी विचारले, तेव्हा शाहरुख म्हणाला की, आता फक्त ट्रेन (चेन्नई एक्स्प्रेस)बद्दल बोला, सरोगेट बेबीची चर्चा नको.
या कार्यक्रमाला शाहरुखची पत्नी आणि या सिनेमाची निर्माती गौरी खान अनुपस्थित होती. त्यामुळे गौरी आपल्या बाळाची काळजी घेण्यासाठी घरीच थांबली अशी दबक्या स्वरात चर्चा सुरु आहे.