आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अथक प्रयत्नानंतर तयार झाले \'जय हो\'साठी सलमानचे ड्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'जय हो' सिनेमा आज (24 जानेवारी) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. 'जय हो'चा मुख्य अभिनेता सलमान खान या सिनेमात एका सामान्य माणसाची भूमिका साकारत आहे. 'जय हो' सिनेमामध्ये एका सामान्य माणसाची कथा असल्याने त्याला त्यासाठी साधा लुक हवा होता, म्हणून सिनेमाच्या शुटिंगवेळी त्याने त्याच्या डिझाइनरला साधे ड्रेस डिझायइन करण्यास सांगितले होते.
डिझाइनर ऐश्ले रिबेलो आणि सलमानची बहीण अल्वीरा अग्निहोत्री यांना याविषयी आधीच सुचना दिल्या होत्या. हे दोघेही 'वॉन्टेड' (2009) सिनेमापासून सलमानच्या प्रत्येक सिनेमातील भूमिकेप्रमाणे त्याचे ड्रेस डिझाइन करत आहेत.
ऐश्ले सांगतो, की 'जय हो' सिनेमा त्याच्यासाठी एका आव्हानापेक्षा कमी नाहीये. 'जय हो'मध्ये आम्ही त्याला कोणताही ड्रेस घालायला देणे शक्य नव्हते. त्याचा लुक समाधानकारक असायला हवा, अशी आमची इच्छा होती. विशेष म्हणजे, सलमानचा लुक हा सिनेमाच्या मॅसेजलाही मॅच करणारा असायला हवा, असं आमचं मत होतं.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या सिनेमाविषयीच्या अधिक रंजक गोष्टी...