आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी ओम पुरीवर गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पद्मश्री सन्मानित प्रख्यात अभिनेता ओम पुरी यांच्यावर रविवारी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नी नंदिता यांच्या फिर्यादीवरून घरगुती हिंसाचार कायद्याखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. अंधेरीतील घरात पुरी यांनी आपल्याला काठीने मारझोड केल्याची नंदिताची तक्रार असल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.


नंदिता यांच्याशी ओम पुरी यांनी दुसरा विवाह केला आहे. वीस वर्षांपासून ते पती-पत्नी आहेत. नंदिता यांनी अलीकडेच ओम पुरी यांच्या अभिनय कारकीर्दीवर एक पुस्तक प्रकाशित केले आहे. त्यात दिलेल्या माहितीवरून त्यांच्यात तणाव निर्माण झाला. यातूनच हा प्रकार घडला.


फ्लॅटच्या मेंटेनन्सवरून वाद :
अंधेरीच्या वर्सोवा भागातील सेव्हन बंगलोज वसाहतीतील ट्रुशील बिल्डिंगमधील फ्लॅटच्या मेंटेनन्सवरून ओम व नंदिता यांच्यात वाद सुरू होता. यातूनच नंदिता यांना रात्री नऊ वाजता ओम पुरी यांनी मारहाण केली. नंदिता यांनी रात्री 11.30 वाजता ठाणे गाठून तक्रार नोंदवली, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.