आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

350 हून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते प्राण यांना चित्रपटसृष्टीत सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या 93 वर्षी त्यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. गुणी आणि अष्टपैलू अभिनेता म्हणून प्राण यांना ओळखले जाते. बॉलिवूडमध्ये खलनायक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शिवाय चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.

PHOTOS : चित्रपटांमध्ये नशीबानेच आले प्राण साहेब

एवढी वर्षे होऊनदेखील प्राण साहेबांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर न झाल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे गेल्यावर्षी दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी प्राण यांच्या नावाचा विचार करण्यात आला होता. मात्र त्यावर्षी त्यांची निवड या पुरस्कारासाठी होऊ शकली नव्हती. मात्र अखेर यावर्षी त्यांच्या नावाची घोषणा या पुरस्कारासाठी करण्यात आली.

यापूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे, अभिनेता देव आनंद आणि दिग्दर्शक-निर्माता यश चोप्रा यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

प्राण साहेबांना प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने चित्रपटसृष्टीत आनंद व्यक्त केला जातोय.