आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Danny Boyle Talking About Slumdog Millionaire Children

‘स्लमडॉग...’ची मुले आनंदी आहेत- डॅनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2008 मध्ये आलेल्या आपल्या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झालेले झोपडपट्टीतील मुले प्रदर्शनानंतर निरंतर प्रगती करत असल्याचे दिग्दर्शक डॅनी बॉयल म्हणाले आहेत.
रुबीना अली आणि अझरुद्दीन इस्माइल, दोघांनी आपले जीवन मुंबईच्या झोपडपट्टीतून सुरू केले होते. नंतर त्यांना 2006-07 मध्ये ‘स्लमडॉग मिलेनियर’ सारख्या चित्रपटात लतिका आणि सलीम यांच्या भूमिका मिळाल्या. तेव्हापासून त्यांचे जीवन पालटले. ब्रिटिश दिग्दर्शक डॅनी बॉयल यांच्या या चित्रपटाला 2009 मध्ये आठ पुरस्कार मिळाले होते. ज्या मंचावर आतापर्यंत बॉलिवूडचे दिग्गज पोहोचले नाहीत त्या मंचावर ही मुले दिसली. त्यावेळी डॅनी म्हणाले होते की, या मुलांची चांगली देखरेख केली जाईल. त्यांना चांगल्या शाळेत टाकले जाईल. आता या गोष्टीला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र डॅनीने खरचं तसे करून दाखवले. त्यांनी मुलांना चांगल्या शाळेत टाकले आहे. दरवर्षी मुलांना भेटायला जात असल्याचेही ते म्हणाले.
द हॉलिवूड रिपोर्टरशी बोलताना डॅनी म्हणाले की, आम्ही त्यांना असीमा शाळेत पाठवले. ती शाळा महिला चालवतात. त्यामुळे मुलांचा चांगला फायदा होत आहे. या मुलांना चित्रपटावेळी इंग्रजी बोलता येत नव्हते आता ते चांगले बोलत आहेत. त्यांच्या भविष्याची योजनादेखील त्यांनी आखल्याचे ते म्हणाले.