आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ये जवानी...'मुळे दीपिका-रणबीरची जवळीक वाढली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोनचा ‘ये जवानी है दिवानी’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा करत असताना दोघांमधील जवळीकताही वाढली आहे. असे ऐकण्यात आले आहे की, मार्च 2008 मध्ये ‘बचना ऐ हसीनों’मध्ये सोबत काम केल्यानंतरपासून दीपिका आणि रणबीर यांच्यात दाट मैत्रीला सुरुवात झाली होती. मात्र, नोव्हेंबर 2009 मध्ये दोघेही वेगळे झाले होते. आता या दोघांमध्ये पुन्हा जवळीकता वाढली आहे. तसेच ते एकमेकांच्या खासगी सवयींच्या बाबतीतही चांगले अवगत झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या सिनेमाच्या प्रीमियरदरम्यान दीपिकाने सांगितले की, ‘माझा मित्र रणबीर कपूर किडे आणि झुरळालाही घाबरतो. जर तुम्ही एका खोलीत असाल आणि तेथे किडे किंवा झुरळ दिसून आले तर तुम्ही त्यांना पळवण्याच्या मागे लागाल, पण रणबीर पलंगाखाली लपून जाईल. हे मी अनुभवाने सांगत आहे.’