आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'शुद्धी'त रणवीर-दीपिकाला कास्ट केलेले नाही, करणचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने स्पष्ट केले आहे, की त्याच्या आगामी 'शुद्धी' या सिनेमात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणला कास्ट करण्यात आलेले नाही.
मागील काही दिवसांपासून 'शुद्धी' सिनेमाविषयी बरीच चर्चा रंगतेय. करण जोहरला हृतिक रोशन आणि करीना कपूर यांच्यासोबत शुद्धी सिनेमा करायचा होता. मात्र हृतिक आणि करीनाने सिनेमाला आपला नकार दिला. त्यामुळे करणने रणवीर आणि दीपिकाला साइन केल्याची चर्चा रंगू लागली होती. 'गोलियों की रासलीला रामलीला' या सिनेमातील रणवीर आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीला पडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री बघण्यास प्रेक्षक नक्कीच इच्छुक असतील. पण करणने या दोघांनाही साइन केले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
'शुद्धी' हा सिनेमा यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज करण्याचा करणचा विचार होता. मात्र आता त्याचे रिलीज लांबणीवर पडले असून पुढील वर्षी हा सिनेमा ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज करणार असल्याचे करणने सांगितले. हा सिनेमा करण मल्होत्रा दिग्दर्शित करणार असून करण जोहर याचा निर्माता आहे. हा सिनेमा पुर्नजन्मावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.
आता या सिनेमात कोणत्या कलाकारांना कास्ट करण्यात येईल हे लवकरच स्पष्ट होईल.