आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
यावर्षी मकाऊमध्ये झालेल्या आयफा अवार्ड समारंभात बरयाच नाटकीय घडामोडी झाल्या आहेत. दीपिका पदुकोनच्या सध्याच्या बॉयफ्रेंडची माजी गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा हिच्यासोबत तिचे पॅचअप झाल्याचे वृत्त चांगले चर्चेत राहिले आहे. बॉलिवूडचा शहेनशहा शाहरुख खानने आयोजित केलेल्या पार्टीत दोघींचे पॅचअप झाल्याचे समजते. यावेळी दोघींनी एकमेकींसोबत बरीच चर्चा केली आणि चांगल्या वातावरणात वेळ घालविला.
आतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्काने दीपिकाला सांगितले, की तू प्रेमात असल्याने खुप सुंदर दिसत आहेस. सध्या तुझ्या चेहरयावर प्रेमाचा रंग फुललेला आहे.
त्यानंतरही दीपिकाची नाराजी दूर झालेली नव्हती. परंतु, अनुष्काने दीपिकाची प्रशंसा करण्याचा सपाटाच लावल्याने शेवटी नाईलाजास्तव दीपिकाला आपली नाराजी दूर फेकून मैत्रिच्या प्रांगणात यावेच लागले. त्यानंतर दोघी अगदी मनमोकळ्या गप्पा मारताना, एकमेकींवर जोक्स करताना आणि खुल्या वातावरणात चर्चा करताना दिसत होत्या. यावेळी दोघींमध्ये रणविर आणि त्याच्या कामावरही चर्चा झाल्याचे समजते.
अनुष्काने दीपिकाला तिच्या नवीन नात्यासाठी शुभेच्छा दिल्या असून दोघींनी कायम संपर्कात राहण्याचे एकमेकींना आश्वासन दिले असल्याचे वृत्त आहे.
अनुष्का आणि दीपिकाची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.