आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Inside Washroom, Ranveer Kept Waiting Outside Deepika

PICS: वॉशरुमध्ये दीपिका, वॉशरुमच्या बाहेर रणवीरचा पहारा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या वागण्याकडे बघून असे जाणवते, की ते एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. हो खरंच, अलीकडेच दीपिका आणि रणवीर हेमा-धर्मेंद्र यांची मुलगी अहानाच्या रिसेप्शनमध्ये गेले होते. तिथे त्यांनी इतक्या गप्पा मारल्या त्यांच्याकडे बघून असे वाटत होते, की ते खूप दिवसानंतर एकमेकांना भेटले आहेत.
पार्टीमध्ये उपस्थित एका व्यक्तीने सांगितले, की 'राम-लीला' सिनेमातील गाणी वाजायला लागली आणि दीपिका डान्स करण्याचा मोह आवरु शकली नाही. त्यावेळी रणवीरनेसुध्दा तिला साथ दिली.
विशेष म्हणजे, 'राम-लीला'च्या गाण्यांपूर्वी 'बदतमीज दिल' गाणे चालू होते, तेव्हा दोघांनीही त्या गाण्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्यांच्या सिनेमाचे गाणे लागले तर दोघेही ठुमके लावायला लागले.
अहानाच्या रिसेप्शनला उपस्थित असलेल्या एका सुत्राने सांगितले, की पूर्ण पार्टीत रणवीर आणि दीपिकाची बरीच जवळीक दिसून आली. या दोन्ही स्टार्सने ते एकमेकांच्या किती जवळ आहेत यांची या रिस्प्शनमध्ये एक वेगळीच झलक दाखवली. झाले असे की, पार्टीत रणवीर दीपिकाच्या मागे-मागे बाथरुमपर्यंत गेला. जोपर्यंत दीपिका बाथरुमध्ये होती रणवीर तिची बाहेर उभा राहून वाट बघत होता.
रणवीरच्या या कृत्यामुळे चर्चा आहे, की तो दीपिकाची खूपच काळजी घेतो. म्हणूनच तो दीपिकासोबत बाथरुमपर्यंत गेला.
या दोन्ही स्टार्सची 'राम-लीला' सिनेमाच्या दरम्यान जवळीक वाढली आहे. सिनेमाची शुटिंग संपल्यानंतरसुध्दा दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. परंतु यांनी कधीच त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. आमची चांगली मैत्री आहे फक्त असे सांगून दोघेही मौन बाळगतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा दीपिका आणि रणवीरची अहानाच्या रिसेप्शन पार्टीमधील छायाचित्रे...