आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुल आहे दीपिका- रणबीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर पुन्हा एकदा ‘ये जवानी है दीवानी’मध्ये दीपिकासोबत दिसणार आहे. दीपिकासोबत काम करण्यात खूप आनंद येतो, असे रणबीर म्हणाला आहे. तो म्हणतो की, दीपिका खूप भावुक आणि महत्त्वाकांक्षी आहे. ती आपले काम प्रामाणिकपणे आणि एकाग्रतेने करते म्हणून तिच्यासोबत काम करायला चांगले वाटते. मलाच नव्हे तर कोणालाही तिच्यासोबत काम करायला अडचण येत नसेल. आम्ही दोघेही प्रोफेशनल आहोत.

खरचं दीपिका आणि रणबीर वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंधांना मिक्स करत नाहीत. ‘बचना ऐ हसीनों’ मध्ये दोघे एकत्र दिसले होते. त्यावेळी या दोघांच्या अफेयरची चर्चा होती. ही गोष्ट त्यांच्या घरापर्यंत पोहोचली होती. रणबीरच्या आईलासुद्धा दीपिका आवडली होती. दीपिका त्याच्या घरीसुद्धा जात होती. मात्र काहीच दिवसांत त्यांच्यात बिनसले आणि दोघे वेगळे झाले. नंतर दीपिकाने सिद्धार्थ माल्यासोबत मैत्री केली होती.