2013 बॉलिवूड इंडस्ट्रीसाठी लकी होते असेच म्हणावे लागेल. कारण गेल्यावर्षी बॉलिवूडच्या इतिहासात पहिल्यांदा एका सिनेमाने 500 कोटींपेक्षा जास्त कमाई करून विक्रम रचला आहे. एकुणच मागील वर्षी सर्वच सिनेमांनी चांगली कमाई केली होती. त्यामध्ये अधिकतर सिनेमांनी 100 कोटीं कमाई केली तर त्यामधील तीन सिनेमांनी 200 कोटींची कमाई केली होती. सिनेमांच्या कमाईसोबतच, बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनीही अभिनयाची एक वेगळीच छाप बॉलिवूडमध्ये पाडली आहे. फिल्मफेअर अवॉर्डदरम्यान या दोन्ही स्टार्सचीच धूम बघायला मिळाली. बॉलिवूडचे लोकप्रिय फिल्मफेअर मासिकानेसुध्दा या दोघांना त्याच्या कव्हर पेजसाठी निवडले.
मुंबईमध्ये आयोजित समारंभात दीपिका आणि फरहानने फिल्मफेअर मासिकाचे लाँचिंग केले. मासिकाच्या कव्हर पेजवर दीपिका आणि फरहानचे छायाचित्रे आहे. या निमित्तावर मासिकाचे संपादक जितेश पिल्लईसुध्दा उपस्थित होते. या समारंभात दीपिकाने पांढ-या रंगाचा ड्रेस परिधान केलेला आणि तिने ड्रेसला मॅचिंग पांढ-या रंगाचीच सँडल घातलेली होती. फरहानने फिक्या निळ्या रंगाची जीन्स घातलेली होती.
फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात दीपिका पदुकोणला '...राम-लीला' सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच, फरहानला 'भाग मिल्खा भाग'साठी उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मिळाला होता.
फिल्मफेअर मासिकाच्या लाँचिंगची छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...