आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone, Shah Rukh Khan Attend Juhi Chawla’s Brother Sanjeev’s Cremation

दीपिका पदुकोण, शाहरुख खानने वाहिली जुही चावलाचा भाऊ संजीवला श्रद्धांजली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाचा भाऊ संजीव चावला यांचे 9 मार्चच्या सकाळी निधन झाले. भावाच्या निधनाचा जुहीला मोठा धक्का बसला आहे. मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याने ते गेल्या चार वर्षांपासून कोमात होते. संजीव उर्फ बॉबी शाहरुख खानच्या 'रेड चिलीज'चे माजी सीईओ होते.
संजीव यांच्या निधनाची वार्ता समजताच अभिनेता शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण चेन्नईहून तातडीने मुंबईत दाखल झाले. हे दोघेही रजनीकांत यांच्या आगामी 'कोचाडिआन' या सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या निमित्ताने चेन्नईत होते.
संजीव यांच्या अंत्य संस्कारात दीपिका पदुकोण, शाहरुख खान, जुही चावलाचे पती जय मेहता, अभिनेत्री मधू, अनुभव सिन्हा, फराह खान, सुजोय घोष आणि विेवेक शर्मा सहभागी झाले होते. मात्र 'गुलाब गँग'मधील जुही चावलाची को-स्टार माधुरी दीक्षित संजीव यांच्या अंत्य संस्कारात सहभागी झाली नव्हती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा संजीव चावला यांच्या अंत्य संस्काराची छायाचित्रे...