आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deepika Padukone Spends Night At Ranveer Singh’S Home?

रणवीरसिंगच्या घरी रात्रभर थांबली होती दीपिका ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडच्या एखाद्या जोडीविषयी अफवा उडणे हे नित्यनेमाचेच आहे. कधीकधी या बातम्यांमध्ये सत्यता असते, तर कधीकधी त्या अफवाच ठरतात. आता हेच बघा ना, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी हे दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्येसुद्धा हे दोघे एकत्र सहभागी झाले होते.
सध्या रणवीर आणि दीपिका यांच्याविषयी जी चर्चा बी टाऊनमध्ये रंगतेय, ती त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सरप्राईजपेक्षा कमी नाहीये.
एका वेबसाईटने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, दीपिका पदुकोण 4 मार्चच्या रात्री रणवीर सिंगसोबत त्याच्याच घरी थांबली होती. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीवरुन वेबसाईटने लिहिले, "दीपिका रात्री 12च्या आधीच रणवीर सिंगच्या घरी पोहोचली आणि रात्रभर ती तिथेच थांबली. आज सकाळी तिला रणवीरच्या घराबाहेर पडताना बघितले गेले. दीपिका रात्री आपल्या काळ्या रंगाच्या ऑडीने रणवीरच्या घरी पोहोचली होती. मात्र सकाळी नऊच्या सुमारास पांढ-या रंगाच्या मर्सिडीजमधून बाहेर पडली.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या दीपिका रणवीरच्या घरी खरंच थांबली होती, या बातमीत किती सत्यता आहे?