आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'एकापेक्षा एक अप्सरा आली\'च्या लखलखत्या पर्वाची महाविजेती ठरली दीप्ती केतकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौंदर्य आणि नृत्याचा अद्भूत मिलाफ घेऊन 'एकापेक्षा एक'चे लखलखते पर्व सुरु झाले होते. या लखलखत्या सोनेरी पर्वाची सांगता नुकतीच ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने झाली. या झळाळत्या पर्वाच्या विजेतेपदावर 'मला सासू हवी' या मालिकेत अभिलाषा अर्थातच दीप्ती केतकर या अप्सरेने आपली ठसठशीत मोहोर उमटवली. या पर्वामुळे या अप्सरेच्या कसदार अभिनयाबरोबरच नृत्यकौशल्यावरही मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात शिक्कामोर्तब झाले.
एकापेक्षा एकच्या मंचावर लावण्यवती आणि सौंदर्यवतींमध्येही नृत्याची लढत रंगली. लावण्यवती अप्सरांची सम्राज्ञी मेधा घाडगे आणि सौंदर्यवती अप्सरांची राणी मानसी नाईक यांच्या गटातील अप्सरांनी या धमाकेदार सामन्यात विविधरंगी नृत्यांची आतषबाजी केली.
अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या महाअंतिम फेरीत श्रुती मराठे, दीप्ती केतकर, हेमांगी कवी, सुकन्या काळण आणि प्राची चेऊलकर या पाच अप्सरांनी आपल्या चाहत्यांना दिमाखदार नृत्यांचा नजराणा दिला. या पाचही अप्सरांनी लोकनृत्य ते पाश्चात्य नृत्य, लावणी ते हिपहॉप अशा नृत्याच्या विविध शैलीचे आविष्कार घडला.
विजेत्या अप्सरेला झी मराठीकडून एक लाख रुपयांचे बक्षिस तर चारही उपविजेत्या अप्सरांना झी मराठीकडून 75 हजार रुपये आणि मानचिन्ह देण्यात आलं.
या महाअंतिम फेरीत सर्व अप्सरांना चिअर अप करायला त्यांचे काही खास चाहते मंचावर अवतरले होते. हेमांगी कवीला तिचा मित्र विनोदवीर मंगेश देसाईने साथ दिली. तर श्रुतीला 'राधा ही बावरी'चा तिचा नायक सौरभ, प्राची चेऊलकरला विजय पाटकर यांनी साथ देऊन बहार उडवली. तर या सगळ्याहून आश्चर्याचा धक्का दिला तो 'मला सासू हवी' या मालिकेतील सविता प्रभुणे यांनी. दीप्तीला चिअर अप करण्यासाठी सविता प्रभुणे यांनी मंचावर दीप्तीबरोबर ताल धरला होता. या दोघींच्या नजाकतपूर्ण नृत्याने रसिकांचे नेत्र दिपवले.
महागुरु सचिन पिळगांवकर यांनी 'एकापेक्षा एक'च्या शीर्षकगीतावर जोशपूर्ण नृत्य सादर केले. हा दिमाखदार, भव्यदिव्य सोहळ्याचा जल्लोष येत्या रविवारी दस-याच्या दिवशी सांयकाळी सात वाजता झी मराठीवर रसिकांना अनुभवता येणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा या सोहळ्याची एक छोटीशी झलक...