आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचे माझ्यावर असेच प्रेम राहावे- अभिनेत्री डेजी शाह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किती ही मोठे व्हा, मात्र जितके सहज राहाल तितके आपल्यासाठी चांगले असते, हे मी खान कुटुंबाकडून शिकले.
दाक्षिणात्य सिनेमांत हीरोइनला हीरोप्रमाणे महत्त्व मिळत नाही. फीडबॅकदेखील मिळत नाही. मात्र, बॉलिवूडमध्ये तसे नाही. सलमानने लाँच केलेल्या अभिनेत्रीला इंडस्ट्रीत काही भीती राहत नाही. तुलाही असेच वाटते का ?
-हो, इतर अभिनेत्रींप्रमाणे सलमानची माझ्यावर अशीच कृपा राहावी आणि असेच प्रेम राहावे, अशी मी देवाला प्रार्थना करते. सध्या ते माझ्या कामाचे कौतुक करत आहेत. त्यांच्यासोबत काम केल्याने खूप काही शिकायलादेखील मिळाले.
गाण्यामध्ये हीरो-हीरोइनसोबत नृत्य करणारी एक मुलगी बॉलीवूडची हीरोइन झाली आहे. या आठवड्यात प्रदर्शित होणार्‍या 'जय हो' सिनेमात ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत आहे. तिचे नाव डेझी शाह असून 'रंगीला' चित्रपटातील 'मिली'सारखी तिची कहाणी आहे.
2011 मध्ये डेझीने 'भद्रा' या कन्नड सिनेमाततून पदार्पण केले होते. त्यानंतर तिला खूप संघर्ष करावा लागला. हीरो-हीरोइनच्या मागे असलेल्या घोळक्यात नाचत होती. नंतर कोरिओग्राफर गणेश आचार्य यांची सहायक बनली. पुढे जमीन (2003) आणि खाकी (2004) या सिनेमांत सह नृत्यदिग्दर्शन केले. काही दिवस मॉडलिंगदेखील केले. आता हिंदी सिनेमात तिला संधी मिळाली आहे. डेझी शाहसोबत झालेला हा संवाद
पुढील स्लाइड्वर क्लिक करा आणि वाचा डेझीचे मत तिच्याच शब्दांमध्ये...