आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi High Court Stays Release Of Movie Gulaab Gang

दिल्ली हायकोर्टाने \'गुलाब गँग\'च्या रिलीजवर देशभरात घातली बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली हायकोर्टाने बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांच्या 'गुलाब गँग' सिनेमाच्या रिलीजवर देशभरात बंदी घातली आहे. हायकोर्टाने 8 मेपर्यंत या सिनेमावर बंदी घातली आहे. 'गुलाब गँग' 7 मार्च रोजी रिलीज होणार होता.
हायकोर्टामध्ये दाखल झालेल्या याचिकेत सांगितले आहे, की 'गुलाब गँग' बुंदेलखंड (बांदा)च्या गुलाब गँग आणि कमांडर संपत पाल यांच्या जीवनपटावर रेखाटलेला आहे. हा सिनेमा तयार करण्यापूर्वी निर्माता आणि दिग्दर्शकांनी संपत पाल यांच्याशी कोणताही संपर्क साधला नव्हता.
हायकोर्टाने याचिकेवर सुनावणी करून सिनेमा जगभरात रिलीज करण्यावर बंदी घातली आहे. कोर्टाने निर्मात-दिग्दर्शक यांना आपली भूमिका मांडण्यास सांगितले आहे.
पुढे वाचा: संपत पाल यांनी दिली होती सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याची धमकी...