आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Despite A 6cm Tumor, Maanayata Refuses To Get Further Tests Done Without Sanjay Dutt

मान्यताच्या यकृतात 6 सेमीचा ट्युमर, संजय दत्तशिवाय तपासणी करण्यास दिला नकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तची प्रकृती ठिक नसून तिच्या यकृतात 6 सेमीचा ट्युमर असल्याचे निदान झाले आहे. मात्र मान्यता वैद्यकीय तपासणी करण्यास नकार देत आहे. ती संजय दत्तची पॅरॉलवर सुटका होण्याचा वाट बघत आहे. संजयच्या हजेरीतच वैद्यकीय तपासणी करण्याची तिची इच्छा आहे.
बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी संजय दत्त पुण्यातील येरवडा कारागृहात तुरुंगवास भोगत आहे. संजयने पत्नी मान्यताच्या तब्येतीचे कारण देऊन पॅरॉलसाठी अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे त्याला एक महिन्याची सुटीसुद्धा मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या वादांमुळे त्याची सुटी लांबणीवर पडली.
मान्यताची तपासणी करणारे डॉक्टर अजय चौघुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''मान्यताच्या यकृतात सहा सेंटीमीटरचा ट्युमर आहे. हा ट्युमर गंभीर स्वरुपाचा कॅन्सर असल्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी मान्यतावर लवकरात लवकर उपचार होण्याची गरज आहे. ''
मान्यताला कॅन्सर असल्यास तिच्यावर लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याची गरज पडणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
मात्र या सर्व तपासण्या संजय दत्तच्या पॅरॉलवर अवलंबून आहेत. कारण मान्यताला कोणतीही जोखीम उचलायची नसून आपल्या नव-याच्या हजेरीतच सर्व प्रकारच्या तपासण्या ती करु इच्छिते. सध्या मान्यता आपल्या तीन वर्षीय जुळ्या मुलांची स्वतः देखभाल करत आहे.