आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Despite Injury, Shahrukh Khan Attends Ahana Deol\'s Wedding Reception

शाहरुखने दिलेला शब्द पाळला, दुखापतग्रस्त असतानाही पोहोचला अहानाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या आठवड्यात अभिनेता शाहरुख खान त्याच्या आगामी हॅपी न्यू इयर या सिनेमाच्या शुटिंगदरम्यान जखमी झाला होता. या अपघातात शाहरुखच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती. या अपघातानंतर डॉक्टरांनी शाहरुखला आराम करण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून शाहरुखने कामापासून सुटी घेतली आहे. जवळपास सहा ते सात दिवसांनी शाहरुख रविवारी रात्री धर्मेंद्र-हेमा यांची मुलगी अहानाच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसला. हेमामालिनी यांनी शाहरुखला अहानाच्या लग्नाचे आमंत्रण दिले होते. दुखापतग्रस्त शाहरुखने त्यांचे हे आमंत्रण स्वीकारले आणि पार्टीला हजेरी लावली. यावेळी शाहरुख काठीच्या सहाय्याने चालताना दिसला.
शाहरुख या पार्टीत स्टायलिश लूकमध्ये पोहोचला होता. त्याने जे नी ब्रास घातले होते, ते डिझायनर होते. शाहरुखचे फिजिओथेरेपिस्ट डॉ. अली ईरानी यांनी सांगितले, की टोंगळ्यांना आराम देण्यासाठी आणि चालताना त्यावर भार पडू नये, यासाठी शाहरुख नी ब्रास घालून आहे.
पाहा वेडिंग रिसेप्शनमध्ये पोहोचलेल्या शाहरुखची खास छायाचित्रे...