आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Dhanush@30: बघा सासरे रजनीकांत आणि पत्नी ऐश्वर्याबरोबरचे धनुषचे खास फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दाक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार आणि सोनम कपूरचा 'रांझणा'मधील को-स्टार धनुषने 28 जुलै रोजी आपला 30वा वाढदिवस साजरा केला. 'रांझणा' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेणा-या धनुषचे लग्न सुपरस्टार रजनीकांत यांची थोरली मुलगी ऐश्वर्याबरोबर झाला आहे. 2004 मध्ये धनुष आणि ऐश्वर्या लग्नगाठीत अडकले होते. धनुष आणि ऐश्वर्या दोन मुलांचे आईवडील असून त्यांच्या मुलांची नावे याथरा आणि लिंगा अशी आहेत.

धनुषचे खरे नाव वेंकटेश प्रभू आहे. कस्तूरी राजा यांच्या 'आदुकलाम' (2011) या सिनेमात धनुषने काम केले होते. या सिनेमातील भूमिकेसाठी समीक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. या सिनेमासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

'कोलावरी डी...' या गाण्याद्वारे धनुष एका रात्रीत प्रसिद्धीझोतात आला. या गाण्याला सी.एन.एनने 'टॉप साँग ऑफ 2011' म्हणून घोषित केले होते. याशिवाय वंडरबार फिल्म्स या होम प्रॉडक्शनची धुरासुद्धा धनुषने सांभाळली आहे. अलीकडेच धनुषने आपले म्युझिक लेबल 'वंडरबार स्टुडिओ'सुद्धा लाँच केले.

या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला धनुषची त्याचे सासरे रजनीकांत आणि पत्नी ऐश्वर्याबरोबरची छायाचित्रे दाखवत आहोत...