दाक्षिणात्य सिनेमांचा सुपरस्टार आणि 'कोलावरी डी' फेम धनुषची बॉलिवूडमध्ये हळूहळू ओळख निर्माण करण्याची इच्छा आहे. धनुषने यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'रांझणा' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि त्या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने त्याच्यासोबत काम केलं होतं. या सिनेमात काम करतेवेळी धनुषला अनेक अडचणी आल्या होत्या, मग त्या भाषेच्या असो अथवा संस्कृतीच्या.
धनुष म्हणतो, "बॉलिवूडमध्ये मला एका वेळी एकाच सिनेमामध्ये काम करायचं आहे. कारण येथील संस्कृती आणि प्रेक्षकांची पसंत ओळखणं माझ्यासाठी खूप कठिण आहे. मला हळूहळू माझी ओळख निर्माण करायची आहे. मला बॉलिवूडच्या प्रेक्षकांच्या पसंतीच संशोधन करायचं आहे, तेव्हाच मी त्यांना माझ्यातलं सर्वोत्कृष्ट देऊ शकेलं."
आता तो आर. बल्कीच्या सिनेमात काम करत आहे. या सिनेमामध्ये धनुषच्या व्यतिरिक्त अमिताभ बच्चन आणि कमल हसनची मुलगी अक्षरा हसन यांच्याही भूमिका महत्वाच्या आहेत.