आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Hema Daughter Ahana Is Going To Marry

धर्मेंद्र-हेमा मालिनीची धाकटी मुलगी आहानाचा झाला साखरपुडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकमुंबई - थोरली मुलगी ईशाच्या लग्नाच्या एक वर्षानंतर आता धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची धाकटी मुलगी आहना देओलसुद्धा लवकरच लग्नागाठीत अडकणार आहे. गुरुवारी आहना देओलचा साखरपुडा थाटात झाला. दिल्लीचे व्यवसायी वैभव वोहराबरोबर आहनाचा साखरपुडा झाला.

वैभव वोहराने मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीमधून एमबीए केले आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आहना आणि वैभव यांची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. आहना आणि वैभव पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सुरुवातीला या दोघांनी आपले नाते जाहीर केले नव्हते. मात्र जेव्हा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना त्यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर दोघांनीही आनंद व्यक्त केला होता. ईशाप्रमाणेच आहनालाही तिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम खासगी ठेवायचा होता.

वैभव आणि आहनाचा साखरपुडा हेमा मालिनी यांच्या जुहू स्थित राहत्या घरी झाला. आहनाच्या मित्रांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांना शुभेच्छा दिल्या. वेबसाईट पिंकविला डॉट कॉमने आहना आणि वैभवचे हे छायाचित्र प्रकाशित केले आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि आहनाची थोरली बहीण ईशाच्या लग्नाची खास छायाचित्रे..