आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dharmendra Said I Am The Number One Dancer Of Bollywood

PHOTOS : 'शाहरुख, ऋतिक नव्हे, मी आहे बॉलिवूडचा नंबर वन डान्सर'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र म्हणतात, मी इंडस्ट्रीचा नंबर वन डान्सर आहे. 'यमला पगला दिवाना 2' या सिनेमाच्या म्युझिक लाँच सोहळ्यात मीडियाशी बोलताना धर्मेंद्र म्हणाले की, ''मी तुम्हाला अशी गोष्ट सांगू इच्छितो, जी मी अनेक वर्षे सांगू शकलो नाही. मी बॉलिवूडचा नंबर वन डान्सर आहे.''
या सोहळ्याला बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. शाहरुख खान, आमिर खान, ऋतिक रोशन, जुही चावला, राकेश रोशन, कुणाल कोहली, रमेश सिप्पी, रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, राजकुमार संतोष यांच्यासह अक्षय कुमारही या सोहळ्याला उपस्थित होता. यावेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या सगळ्यांचे धर्मेंद्र यांनी आभार व्यक्त केले.
धर्मेंद्र यांनी म्हटले की, ''तुमच्या सगळ्यांचे प्रेम आणि पाठिंब्यासाठी मी आभारी आहे. तुमच्या प्रेमामुळेच मी इथवर पोहोचू शकलोय.'' हा सिनेमा येत्या 7 जूनला रिलीज होतोय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा या इवेंटची खास छायाचित्रे...