आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'DHOOM 3'ने रचला नवा इतिहास, केवळ दोन दिवसांतच कमावला तब्बल 109 कोटींचा गल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशराज बॅनरचा 'धूम 3' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील सिनेमा आहे. या सिनेमाने दोनच दिवसांत त्याची कमाल दाखवली आहे. या सिनेमाविषयी रिलीजच्या 3 महिन्यांपूर्वीपासूनच चर्चा सूरु झाली होती. हा सिनेमा यावर्षातील सर्वात मोठा सिनेमा ठरेल, असा अंदाज ट्रेड पंडितांनी लावत होता.
'धूम 3' च्या बॉक्स ऑफिसवरील ताज्या कलेक्शनवर एक नजर टाकली तर या सिनेमाने रिलीजच्या दोनच दिवसातच 100 कोटींचा आकडा पार केला आहे. शुक्रवारी हा सिनेमा सर्व देशभरात रिलीज करण्यात आला होता. आतापर्यंत या सिनेमाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 109 कोटीपेक्षा जास्त झालं आहे. 'धूम 3' ने शुक्रवारी भारतात 36 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. ही बॉक्स ऑफिसवरची आजपर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग आहे. 'धूम 3'ने 'चेन्नई एक्सप्रेसचा' रेकॉर्ड मोडित काढला. आता अंदाज बांधला जातोय, की पहिल्या आठवड्यात 'धूम 3' पूर्ण जगभरातून 190 कोटींचा व्यवसाय करेल.
या पॅकेजच्या माध्यामातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, की 'धूम 3'ने कोठे किती कमाई केली आहे आणि 2 दिवसातच कसा पार केला 100 कोटींचा आकडा...