आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhoom 3 Latest News: Aamir Khan Tap Dance In New Song

DHOOM 3: बघा आमिरची TAP DANCE करतानाची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावर्षीचा बिग बजेट, बिग बॅनर आणि बिग स्टारकास्ट असलेला 'धूम 3' हा सिनेमा 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. रिलीजपूर्वी निर्माते सिनेमाच्या प्रसिद्धीत कोणतीही कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीयेत.
काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील पाच कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या मलंग सिनेमाची झलक रिलीज करण्यात आली. या गाण्यात आमिर खान आणि कतरिना कैफ एक्रोबेट करताना हवेत कसरती करताना दिसले. आता या सिनेमात नवीन गाणे 'धूम'चा टीजर रिलीज करण्यात आला आहे. या गाण्यात आमिर टॅप डान्स करताना दिसतोय.
खरं तर आमिर नृत्यात तरबेज नाहीये. मात्र या सिनेमासाठी त्याने आपल्या डान्सिंग स्किल्सवर बरीच मेहनत घेतली आहे. त्याची झलक या गाण्यात नक्कीच बघायला मिळत आहे.
टॅप डान्स हा कठिण नृत्यप्रकार आहे. हा नृत्यप्रकार प्रत्येकाल जमतोच असे नाही. मात्र आमिर हा नृत्यप्रकार करायला शिकला आणि त्याने तो योग्यप्रकारे सादरसुद्धा केला. ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षित डान्सर्सनी आमिरला हा नृत्यप्रकार शिकवला.
बघा या गाण्याची खास छायाचित्रे...