आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धूम-3’मधील गाण्यांना सुफी संगीताची बाज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि बार्बी गर्ल कॅटरिना कैफ यांचा आगामी आकर्षण असलेल्या ‘धूम-3’ मधून प्रेक्षकांना दर्जेदार अभिनयासोबतच आत्मस्पर्शी आणि कर्णमधुर सुफी संगीताचीही मेजवानी मिळणार आहे. धूम आणि धूम-2च्या गाण्यांनाही कमालीची लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे मालिकेतील तिस-या चित्रपटातील गाण्यांनाही प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवून देण्याचे आव्हान संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्यावर आहे. त्यामुळे धूम-3 मधील गाण्यांवर प्रचंड मेहनत घेतली जात आहे.
एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, धूम-3 मधील गाण्यांना सुफी बाज देण्याचा यापूर्वी विचार नव्हता. मात्र, चित्रपटाची गरज ओळखून संगीतकारांकडून बहुतांश गाण्यांना सुफी टच देण्यात येत आहे. चित्रपटातील गाणे मुळात सृजनात्मक असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस अवश्य उतरतील.