'यशराज बॅनरखाली बनवण्यात आलेला या वर्षीचा सर्वाधिक चर्चेत असलेल्या 'धूम 3' या सिनेमाने चार दिवसातच त्याची कमाल दाखवून दिली. रिलीजपूर्वी सिनेमाविषयी 3 महिनेअगोदर चर्चा सूरु झाली होती. ट्रेड पंडित अंदाज लावत होते, की या वर्षीचा हा सर्वात मोठा सिनेमा ठरणार आहे आणि सिनेमाने प्रदर्शनही तसचं केलं. 'धूम 3' च्या बॉक्स ऑफिसवरील ताज्या कलेक्शनवर एक नजर टाकली तर या सिनेमाने रिलीज झाल्यानंतर चारचं दिवसांत 200 कोटींचा आकडा पार केला. हा सिनेमा जगभरात शुक्रवारी रिलीज झाला होता आणि या सिनेमाचं वल्र्ड वाइड कलेक्शन 200 कोटींच्या पलिकडे गेलं आहे. सिनेमा समिक्षक तरण आदर्शने या सिनेमाच्या कमाईचे आकडे दिले आहेत. सिनेमाने भारतात 129.32 कोटीं आणि 73.17 कोटींचा व्यवसाय केला आहे. दोन्ही कमाईला जोडलं तर हा आकडा 202.49 कोटींचा आहे. 'धूम 3'ने 200 कोटींच्या घरात पाय ठेवून दोन सिनेमांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. यापूर्वी 'चेन्नई एक्सप्रेस' आणि 'क्रिश 3' 200 कोटी क्लबमध्ये सामिल झाले आहेत. 'धूम 3' यावर्षीचा चार दिवसांमध्ये सर्वात जास्त व्यवसाय करणारा सिनेमा ठरला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहीती...