आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिया म्हणते, 'रॅम्पवर चालण्याची मजा काही औरच'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कपडे जेवढे कमी वजनाचे आणि परिधान करण्यास सोपे असल्यास रॅम्पवर चालण्याची मजा काही औरच असल्याचे दिया मिर्झाचे म्हणणे आहे. लॅक्मे फॅशन वीकच्या चौथ्या दिवशी डिझायनर अनिता डोंगरेच्या शोची दिया मिर्झा शोस्टॉपर होती.

यावेळी तिने गोल्डन कलरची फूल स्लीव्ज चोली आणि नाजूक डिटेलिंग असलेला लहेंगा परिधान केला होता. दिया म्हणाली, की यावेळी मी परिधान केलेले कपडे खूप कमी वजनाचे होते, त्यामुळे रॅम्पवर अगदी सहज चालता आले. यावेळी मला खूप मजा आली.

सध्या दिया तिच्या होम प्रॉडक्शनच्या 'बॉबी जासूस' या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. रॅम्पवर चालणे आपले पहिले प्रेम असल्याचेही दियाने यावेळी सांगितले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा रॅम्पवरील दियाची खास छायाचित्रे...